नळदुर्ग :- विविध क्षेत्रातील गुणवंतांचा युवकांनी आदर्श घेऊन इतरांपेक्षा आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवावा असे सांगून खोट्या अफवा पसरवू नका, संशय आल्यास ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव मिरकले यांनी खुदावाडी (ता. तुळजापूर) येथे विविध क्षेत्रातील गुणवंतांच्या सत्काराप्रसंगी केले.
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी गावाच्या सुपूञ असलेल्या गुणवंताचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आयोजित सोहळा करण्यात आला होता. या कार्यक्रमास नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संजिवन मिरकले, ग्राम स्वच्छता अभियानाचे अध्यक्ष डाॅ. सिद्रामप्पा खजुरे, सरपंच शरद नरवडे, माजी सरपंच रेवणसिध्द स्वामी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रघुनाथ ढेंबरे, प्रा. संतोष नरे, तुकाराम बोंगरगे, पोलिस पाटील बसवेश्वर सांगवे आदीजण उपस्थित होते.
यावेळी आदर्श शिक्षक मनोहर घोडके, वैद्यकीय क्षेत्रातील डाँ सचिन स्वामी, पञकार सतिश राठोड, रत्नाकर चिंचोले, भक्ती चिंचोले, दिग्गजा उकरंडे आदि गुणवंताचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार, शाल, फेटा बाधुन व वृक्ष भेट देवुन गौरव करण्यात आला. शेवटी अध्यक्षिय समारोप सरपंच शरद नरवडे यानी केले. यावेळी राम जवळगे , उमा चिंचोले , रवि कबाडे , भास्कर व्हलदुरे , आप्पाराव मुळे विश्व बोंगरगे यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार आय्युब झरेकर यानी मानले.