उस्मानाबाद : पोलिस पाटील हे गावपातळीवरील महत्वाचे पद असून प्रशासनाचे नाक व डोळे आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच पोलिस पाटील विविध जबाबदार्या पार पाडून प्रशासनाला मदत करतात. बदलत्या काळात त्यांचे कामाचे स्वरूप बदलले असून त्यांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी केले.
उस्मानाबाद येथील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सोमवार दि.9 रोजी पोलिस पाटील जिल्हा प्रशिक्षण मेळावा संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. तहसीलदार राजकुमार माने, भाजपाचे प्रदेशकार्यकारणी सदस्य नितीन काळे, पोलिस पाटील संघठनेचे प्रदेशाध्यक्ष पंढरीनाथ पाटील, कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, महासचिव श्रीकृष्ण साळुंके, सचिव कमलाकर माने, संघटक बळवंतराव काळे, जिल्हाध्यक्ष हानमंत देवकते, बेंबळीचे एपीआय उत्तम जाधव, प्रदेश सदस्य दिनकर पाटील, हारूण काझी, धनंजय गुंड, सुभाष कदम पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दिप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त पोलिस पाटील, नुतन व आदर्श पोलिस पाटलांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तहसीलदार माने, भाजपा चे नितीन काळे, बाळासाहेब शिंदे, कमलाकर मांगले, उत्तम जाधव, श्रीकृष्ण साळुंखे, हनुमंत देवकते आदींची भाषणे झाली.
कार्यक्रमाला सुनिल पाटील, प्रशांत पाटील, प्रमोद माळी, मनिषा जगताप, ज्योतीराम काटे, मधुकर चव्हाण, महेश पाटील, सुर्यकांत पाटील, राहुल वाकुडे, एकनाथ वाघमारे, रमेश गायकवाड, हरिदास हावळे, बिभिषण थोरबोले यांच्यासह जिल्हयातील पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.