नळदुर्ग :- पीक विमा भरण्यासाठी येत असलेल्या अडचणी, ऑनलाइनचा गोंधळ आणि ऑफलाइन मध्ये उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेककडून होत असलेली दिरंगाई, यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सकाळी लवकरच पहाटेपासून नळदुर्ग शहरातील डिसीसी बँकेसमोर ताटकळत थांबल्याचे दिसून आले. नळदुर्गसारखेच चिञ सर्वञ दिसत असून मोदींच्या 'डिजिटल इंडियाचा' फज्जा उडाला आहे. शेतातील कामे सोडून पीक विमा भरण्यासाठी असंख्य शेतकरी आपला दिवस घालवत आहेत.
    नळदुर्ग येथील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उघडण्यापूर्वीच मंगळवार दि. 24 जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासूनच प्रधानमंत्री पिक विमा भरण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. पीक विमा भरण्याची अंतिम तारीख बिगर कर्जदार शेतक-यांसाठी 24 जुलै अशी जाहीर केली होती. मात्र पिक विमा भरण्यास दि. 31 जुलै पर्यंत शासनाने मुदत वाढ दिली आहे. 

 
Top