तुळजापूर :-‍ शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी सोमवार दि. 23 जुलै रोजी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी दर्शन घेतले.  याप्रसंगी देवीची प्रतिमा देवून डॉ. सुरेश हावरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुजेचे पौरोहित्य उमेश रोचकरी यांनी केले. याप्रसंगी धनंजय मगर, शिवजी रोचकरी, बाळु साळवे, शंकर कोळेकर आदीजण उपस्थित होते.

 
Top