अहमदनगर :  मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे  यांनी सोमवार रोजी  जलसमाधी घेतली. ही घटना अत्यंत दुर्दैवी घडली. या घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवार रोजी  महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला लाखो वारकरी पंढरपूर येथून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. या मुळे आजचा  बंद हा शांततेत होण्यासाठी व्हाँटसपसह सोशल मिडीयावर  मेसेज फॉरवर्ड करतांना वातावरण चिघळले जाईल असा कुठलाही मेसेज फॉरवर्ड होणार नाही याची  सर्वांनी  दक्षता घ्यावी, असे आवाहन श्रावणबाळ माता पिता सेवा संघटनेचे अध्यक्ष  राजेंद्र निबाळकर यांनी केले आहे
 
Top