लातूर : लातूर येथे मराठा क्रांती मोर्च्यातील एका युवकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. अमोल जगताप (वय, २५) असे आत्‍मदहन करणाऱ्या युवकाचे नाव असून, तो रेणापूर तालुक्यातील वाला गावचा रहिवाशी आहे.  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ करत असून, त्यामुळेच माझ्या भावाने आत्महत्या केली आहे. मी तरी कशाला जिवंत राहू? म्हणत अमोलने स्वतः जवळची पेट्रोलची बाटली अंगावर ओतली. यावेळी तेथे उपस्थित असलेले पोलिस जमादार शिवाजी केंद्रे यांनी ती हिसकावून घेतली. अमोलच्या डोळ्यात पेट्रोल गेल्याने उपचारार्थ त्याला शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. 

 
Top