तुळजापूर : शेजारच्या कर्नाटक व गुजरात राज्यांतील दूध उत्पादकांना ज्याप्रमाणे त्यांच्या खात्यांवर थेट अनुदान दिले जाते, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही दूध उत्पादकांच्या खात्यांवर लिटरमागे थेट पाच रुपये अनुदान जमा करण्यात यावे, या मागणीसाठी
राज्यातील दूध
उत्पादकांनी
बेमुदत
दूध
बंद
आंदोलन
पुकारले
आहे.
या पार्श्वभुमीवर तुळजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी
संघटनेच्यावतीने दुध बंद आंदोलनाची सुरुवात रविवारी श्री तुळजाभवानी मातेला दुधाचा
अभिषेक घालून करण्यात आली.
रविवार
रोजी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध नोंदवत रस्त्यावरुन जाणारी
दुध डेअरची वाहने अडवून पिशव्यांमधील दुध रस्त्यावर ओतून दिले. तसेच चालकांना दुधपुरवठा
बंद करुन आंदोलनात सहभागी होवून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, उपाध्यक्ष धनंजय पेंदे, तालुकाध्यक्ष
दुर्वास भोजणे, विदयार्थी तालुकाध्यक्ष रोहित चव्हाण, गणेश बेले यांच्यासह संघटनेचे
पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.