नळदुर्ग : सहा महिन्यानंतर शहरामध्ये पुन्हा एकदा अज्ञात  चोरट्यानी  धुमाकूळ घालुन दि.१२ जुलैच्या रात्री व्यासनगरमधील  चार ते पाच घरे फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.   
 चोरट्यानी पोलिसाना एकप्रकारे  आव्हान दिले असुन  या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, तसेच शहरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. चोरट्यानी  किती मुद्देमाल चोरून नेला हे माञ समजु शकले नाही
       नळदुर्ग शहरात   गुरुवारी रात्री महामार्गालगत असलेल्या व्यासनगरमधील  चार ते पाच घराचे कुलूप, कोयंडे तोडून चोरट्यानी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. माञ एक मोबाईल पळवण्यात अज्ञात चोरटे यशस्वी झाले. यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे पोलीससमोर आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनी तात्काळ या चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच शहरात रात्रीची गस्त  वाढवावी अशी मागणी होत आहेचोरीचा प्रयत्न फसलेल्या घरापैकी काही घरात सध्या कोणीच रहात नसल्याने  समजते
     घटनास्थळी पोलिसानी भेट देवुन पाहणी केली आहे.शहरातील सर्वच भागात पोलिसाची  राञीची गस्त वाढवण्यात येणार आसल्याची माहिती नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संजिवन मिरकले यांनी दिली. याप्रकरणी पोलिसात उशिरा पर्यंत नोंद झाली नाही.

 
Top