नागपूर : 4 जुलैपासून सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले असुन आगामी हिवाळी अधिवेशन आता 19 नोव्हेंबर रोजीपासुन मुंबईत होणार आहे.
पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत 21 विधेयके मंजूर झाली. यावेळी मुंबईत होणारे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आठवडे घेण्यात आले. मात्र विदर्भात अधिवेशन होत असतानाही नाणार प्रकल्प, शिवस्मारकाची उंची, नवी मुंबईतील सिडकोच्या जमिनीचा कथित घोटाळा आणि आमदारांच्या हक्कभंगाच्या प्रकरणांमुळे हे अधिवेशन गाजले. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ, मराठवाड्यासाठी सुमारे 22 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले.