तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेला पिंपरी चिंचवडचे माजी महापौर तथा सराफ व्यापारी कैलास महादेव भांबुर्डेकर यांनी सोमवारी १० किलो वजनाची चांदीची मूर्ती व सोन्याचे दागिने अर्पण केले. तत्पूर्वी या मुर्तीची “आई राजा उदो उदो” च्या गजरात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
भांबुर्डेकर परिवाराचे पारंपारिक पुजारी बुबासाहेब कदम-पाटील व प्रभारी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे यांच्या हस्ते चांदीच्या मूर्तीची पूजा करून मूर्ती वाजतगाजत श्री तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आले. तुळजाभवानी मातेच्या चरण स्पर्शानंतर चांदीची मूर्ती मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार राहुल पाटील यांच्याकडे सपूर्द करण्यात आली. कैलासशेठ भांबुर्डेकर यांची तुळजाभवानी मातेवर निसीम श्रध्दा असून २५ वर्षांपासून ते तुळजाभवानीची सेवा बजावत आहेत. प्रत्येक वर्षी देवीची पूजा विधी करून ५ ते १० तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने अर्पण करून ते अन्नदान करतात. 


 
Top