हिंगोली
: राष्ट्रीय बंजारा मिशन महाराष्ट्र पदेश कमिटीच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी गुलाब
राठोड यांची निवड करण्यात आली आहे. दि. 17 जुलै रोजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बळीराम
राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार यांनी ही निवड केली.
गुलाब राठोड यांची निवड झाल्याबददल राष्ट्रीय अध्यक्ष देवराव राठोड, महिला प्रदेशाध्यक्षा
शारदा चव्हाण, राष्ट्रीय मिडिया प्रमुख वसंत जाधव, प्रदेश उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव
सुनिल पवार, मराठवाडा अध्यक्ष रोहिदास जाधव यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या
आहेत.