नळदुर्ग :- व्यंकटेश जोशी आपसिंगकर यांच्या किल्ले नळदुर्ग या पुस्तकाचे प्रकाशन दुरदर्शवरुन सफर घडविणारे प्रसिध्द अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात शनिवार दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे.
       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कॅबिनेट मंत्री तथा विदयमान आमदार मधुकरराव चव्हाण हे राहणार आहेत. तर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जि.प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोलते, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, आ. राहुल मोटे, आ. सुजितसिंह ठाकूर, आ. सुरेश धस, आ.‍ सतिश चव्हाण, आ. विक्रम काळे, जेष्ठ साहित्यिक विनय आपसिंगकर, नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन युनिटी कंपनीचे मुख्य संचालक कफील मौलवी, भरत जैन, जयधवल करकमकर यांनी केले आहे.


 
Top