नळदुर्ग :- सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील इटकळ ता. तुळजापूर येथे परिसरातील दहा गावातून  सकल मराठा समाजाच्यावतीने  मराठा आरक्षणासह विविध मागण्यासाठी सोमवार दि. 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर सोमवार दिवशी आठवडी बाजार असतानाही इटकळ गावातील व्यापा-यानी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते.
प्रांरभी आंदोलनात बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे, रोहन तोडकर आदींना श्रध्दांजली वाहून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा इटकळ बस स्टॉप वरुन गावातील मारुती मंदीर ते राष्ट्रीय महामार्गावर काढून तासभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. या आंदोलनात कमलाकर चव्हाण, श्रीकृष्ण मुळे, अविनाश पाटील, सुर्यभान सावंत, धोडिंबा शिंदे, नेताजी शिंदे, प्रताप शिंदे, नानासाहेब पाटील शहापूर, राम सातपुते बाभळगाव, दत्ता भोसले आरबळी, ओमराजे भोसले खानापूर, योगेश उंबरे काळेगाव, अमोल गवळी येवती, विजय जाधव शिरगापूर, बाबाराव गवारे केरुर, अतुल चव्हाण चव्हाणवाडी आदीसह जवळपास तीनशे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
     मराठा समाजाला इतर आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण जाहिर करावे, आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे रद्द करावे, यासह इतर मागणीचे निवेदन इटकळ सज्जाचे मंडल अधिकारी एम दुरुगकर व नळदुर्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांना देण्यात आले. यावेळी निवेदन देताना काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. याप्रसंगी इटकळ सह तालुक्यातील शहापूर, बाभळगाव,खानापूर,आरबळी,केशेगाव,काळेगाव, येवती, शिरगापुर, केरुर,चव्हाणवाडी,आदी गावामधुन मराठा बांधव उपस्थित होते.

 
Top