तुळजापूर :- तालुक्यातील बारूळ येथे बिरूदेव यात्रा मोठ्या उत्साहात, भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. यात्रेनिमित्त सकाळी बिरूदेव मंदिराचे मुख्य पुजा-यांच्या उपस्थितीत पुजा संपन्न झाली. यानंतर दुपारी १ वाजेचे दरम्याने पारंपारीक वाद्य ढोल, झांजाच्या गजरात परज भव्य मिरवणुक काढण्यात आली. परज मिरवणुकीत ईरकल पुजारी श्री.बिरूदेव तिगाडे, श्री.रंगनाथ क्षिरसागर, श्री.दत्तात्रय तिगाडे, श्री.सोमनाथ क्षिरसागर, श्री.बिरूदेव लांडगे यांच्या उपस्थितीत बारूळ पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव व बिरूदेवभक्त मोठ्या संख््यने सहभागी झाले होते.
बारूळ गावापासून श्री बिरूदेव मंदिर सुमारे १ किलोमिटर अंतरावर आहे. यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत भंडा-याची उधळन करीत विठ्ठल बिरूदेवाच्या नावान चांग भल या जयजयकाराने पुर्ण परिसर दणाणुन गेला । सायंकाळी ही मिरवणुक श्री.बिरूदेव मंदिरात दाखील झाल्यानंतर मंदिरामध््ये विधिवत पुजा करून नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या वतीने बिरूदेव भक्तांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने बिरूदेव भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
ही यात्रा उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न करण्यासाठी सरपंच शहाजी सुपनार, तानाजी विश्वनाथ क्षिरसागर, किसन लांडगे, कैलास क्षिरसागर, शिवशंकर क्षिरसागर, दिंगबर तिगाडे, एकनाथ भालेकर, केराप्पा तिगाडे, बिरूदेव क्षिरसागर, नागनाथ क्षिरगसार, मुरलाप्पा क्षिरसागर, शिवमुर्ती भालेकर व समितीचे पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.