नळदुर्ग : मराठा आरक्षण मागणीसाठी कै. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करून नळदुर्ग शहर सकल मराठा परिवाराच्यावतीने आज बुधवार रोजी नळदुर्ग बंदची हाक देण्यात आली असून येथील बसस्थानकासमोर सकाळी 11 वाजता रास्ता रोको करण्यात येणार आहे. तसेच मराठा समाजातील तरुण शासनाचा निषेध करण्यासाठी  सामुहिक मुंडण करणार आहेत. याबाबत दि. 24 जुलै रोजी  नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संजीवन मिरकले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कमलाकर चव्हाण, शरद बागल, गणेश मोरडे, विनील जांभळे, तानाजी जाधव आदीजण उपस्थित होते. 

 
Top