उस्मानाबाद -: श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 1983 पासून चालविले जाते. या महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी च्या परीक्षेत 126 आणि 126 च्या पुढे गुण असल्यास आणि द्वितीय वर्ष प्रवेशासाठी डिप्लोमा मध्ये 85 टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षांमध्ये शैक्षणिक शुल्कामध्ये शंभर टक्के सूट देण्यात येईल. 
     त्याचप्रमाणे प्रथम वर्ष प्रवेशाकरिता सीईटी मध्ये 101 ते 125 गुण, डिप्लोमा मध्ये 75 ते 84 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षांमध्ये शैक्षणिक शुल्कामध्ये 75 टक्के सूट देण्यात येईल, त्यानंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेत 91 ते 100 गुण मिळाले असल्यास आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी डिप्लोमा मध्ये 70 ते 74 टक्के गुण मिळालेले असल्यास शैक्षणिक शुल्कात 50 टक्के सूट देण्यात येईल. 
           प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेत 190 गुण मिळाले असल्यास प्रथम वर्ष शैक्षणिक शुल्कात 25 टक्के सूट दिली जाईल. सातत्याने विनाखंड प्रत्येक वर्षी 65 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ही सवलत चालू राहील तसेच गतवर्षीप्रमाणेच शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षासाठी मोफत वसतिगृहाची सुविधा देण्यात येईल, अशी माहिती श्री.तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर जगदे यांनी दिली आहे.

 
Top