नळदुर्ग :- येथील न्यू किड्स गुरुकुलम प्रायमरी स्कुलच्यावतीने आषाढी एकादशी निमित्त नळदुर्ग शहरातून दिंडी काढण्यात आली. यावेळी शाळेतील विदयार्थ्यांची वारकरी पोषाखात टाळ मृंदगाच्या गजरात विठठल नामाचा गजर करीत शहरातील ब्राम्हण गल्ली, गवळी गल्ली ते शाळा या मार्गावरुन दिंडी निघाली होती. याप्रसंगी शाळेच्या संस्थापक अध्यक्षा ॲड. साबळे, ॲड. अरविंद बेडगे, मुख्याध्यापिका अहंकारी यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थित होते.

 
Top