नळदुर्ग : नळदुर्ग पोलिस ठाणे दुरक्षेञ इटकळ पोलिस चौकी व  तुळजापूर पोलीस पाटील संघटनेच्या वतीने गुरुवारी  दि १९जुलै रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक संजीव मिरकले व  इतर मान्यवराच्या  हस्ते १५१  वृक्ष व फळझाडे लागवड करण्यात आले. 
       महाराष्ट्र शासनाने यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवड संकल्पना 1 जुलै ते 31 जुलै या दरम्यान राबविण्याचे ठरविले आहे, त्या अनुषंगाने इटकळ  पोलीस चौकी परिसरात १५१ फळांच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी दीर्घ काळ टिकणारी अशी चिंच; लिंब , आंबा , व इतर वृक्षाची रोपे लावण्यात आली. लागवड केलेल्या सर्व वृक्षाचे संगोपन पोलीस चौकी व ज्यांच्या हस्ते रोपे लावली त्या गावच्या पोलीस पाटिल व मन्यवरांच्या वतीने करण्यात येणार आहे.यावेळी स.पो.निसंजीव मिरकले,राजाभाऊ सातपुते,पोलीस पाटील दिनकर पाटील, मधुकर चव्हाण,विनोद सलगरे,विनायक जाधव यांची प्रमुख उपस्थितीत होते.यावेळी  इटकळ चौकीचे पोलीस कर्मचारी व अंतर्गत येणा-या २२ गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.

 
Top