नागपूर : मराठा आरक्षणाचा मुद्दा विधानसभेत विरोधकांनी उचलून धरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज यावर आपली भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या नोकरभरतीत मराठा समाजासाठी सोळा टक्के जागा राखीव ठेवल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
राज्य सरकारने ७२ हजार जागा काढल्या आहेत. या व्यतिरिक्त आणखी काही जागा रिक्त आहेत. या नोकरभरतीतील १६ टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव समजल्या जातील, असे त्यांनी नमूद केले. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा शासनाच्या अखत्यारित नसून तो न्यायालयाच्या अखत्यारित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
साभार - दै. पुढारी