तुळजापुर : सारोळा ता. तुळजापूर येथे ग्रामंपचायतीच्यावतीने शाळेसाठी टी.व्ही. व क्रिडा साहित्य जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते गुरुवार रोजी शाळेस देण्यात आले. यावेळी महेंद्र धुरगुडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वहयांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने धुरगुडे यांचा सत्कार करण्यात आला. 
     दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांशी व गावकर्‍यांशी महेंद्र धुरगुडे यांनी संवाद साधून शाळेच्या व गावच्या विकासाच्या बाबतीत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी सरपंच मुकुंद पवार, उपसरपंच कांबळे, प्रकाश धनके, महादेव धनके, तानाजी बेले, दयानंद धाकतोडे, अरुण म्हेत्रे, समाधान धाकतोडे, गोविंद चौगुले यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top