नळदुर्ग : येथील शिवय्या स्वामी यांनी सेतु सुविधा केंद्रामध्ये अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करत अल्पदरात सातबारा देत पीकविमा भरण्यासाठी मदत केली. यापुर्वीही स्वामी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी वेगवेगळी कागदपञ माफक दरात व काही वेळा विना शुल्क उपलब्ध करून दिले आहेत.
शनिवार दि.२१ जुलै रोजी शिवय्या स्वामी यांनी शास्ञी चौक येथील आपल्या सेतु सुविधा केंद्रामध्ये शेतकऱ्यांना माफक दरात सातबारा उपलब्ध करून दिला. जिल्ह्यात आनेक ठिकाणी शेतकऱ्यांची लुट होत आसताना स्वामी यांच्या कार्याचे शेतकऱ्यांतून कौतुक होत आहे. शनिवारी असंख्य शेतकऱ्यांनी स्वामी यांच्या सेतु सुविधा केंद्रातून सातबारा व आठ अ नक्कल काढण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी मंडळ अधिकारी अमर गांधले, तलाठी तुकाराम कदम, रफिक फुलारी व असंख्य शेतकरी उपस्थित होते.