तुळजापूर :- आषाढी एकादशी निमित्त तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील माजी जि.प. सदस्य संतोष बोबडे यांच्या सनराई इंग्लिश मिडीयम स्कूल तामलवाडी या गावामध्ये पालखीसह वारकऱ्यांच्या वेषभूषेत दिंडी काढण्यात आली. यावेळी उपस्थित संस्थेचे सचिव श्री ज्ञानेश्वर बोबडे, मुख्याध्यापक श्री आण्णासाहेब माने, तामलवाडी चे सरपंच ज्ञानेश्वर माळी,उपसरपंच दत्तात्रय वडणे, पत्रकार सर्जेराव गायकवाड सह ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमानंर तामलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.