तुळजापूर : इंदोर येथून निघालेल्या प.पु. राष्ट्रसंत डाॅ. भैय्युजी महाराजांच्या अस्थिलश
याञेचे रविवार दि. 15 जुलै रोजी सुर्योदय शिक्षण
संकुल मुर्टा (ता. तुळजापूर) येथे असंख्य भाविकांनी साश्रुनयनांनी दर्शनाचा लाभ घेतला.
अध्यात्मातून राष्ट्रसेवेचा वसा घेतलेल्या पं.
पू राष्ट्रसंत भैय्युजी महाराजांनी दि. 12 जून 2018 रोजी आत्महत्येचा मार्ग स्विकारून
जगाचा निरोप घेतला होता.
आपल्या
लाडक्या राष्ट्रसंताच्या अस्थिकलशाचे भक्तांना यथोचित दर्शन घडावे यासाठी इन्दौर येथून
कलश याञा निघाली होती. भारतातील अनेक राज्य व महाराष्ट्रातील अनेक व महत्वपुर्ण ठिकाणाहून
मुक्काम करत अखेर रविवार दि. 15 जुलै रोजी सायं.4 वा. तुळजापूर तालुक्यातील मुर्टा
येथे भैय्युजी महाराजाच्या अस्थिकलश याञेचे आगमन झाले.त्यावेळी मुर्टा गावातून अस्थिकलशाची पदयाञा काढून येथील
सुर्योदय शिक्षण संकुलातील शनिदेव मंदीरात भक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात आले.
यावेळी मुर्टा व परिसरातील मानमोडी, चिकुंद्रा,
होर्टी, किलज, सलगरा (दि.) इत्यादी पंचक्रोशीतील भक्तांनी अस्थिकलश व पादुका दर्शनाचा लाभ घेतला.
पसायदानाने श्रध्दांजली वाहण्यात येऊन राष्ट्रसंत
भैय्युजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ इ. 1ली ते 12 विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप
करण्यात आली.
अस्थिकलश व पादुका दर्शन कार्यक्रम यशस्वीतेसाठी
सुर्योदय शिक्षण संकुल मुर्टा येथील शिक्षक, कर्मचारी व मुर्टा ग्रामस्थांनी मोठे परिश्रम
घेतले.
यावेळी आपल्या लाडक्या राष्ट्रसंताचे जगात अस्तित्व
नसल्याची उदासीन छटा प्रत्येक भक्तांच्या चेह-यावर दिसत होती. तर यावेळी धनराज न्यूजकडे
प्रतिक्रिया देताना भक्तांना अश्रू अनावर झाले होते.