नळदुर्ग :- येथील ऐतिहासिक व निसर्गरम्य किल्ल्यात सोलापूरच्या मुख्य जैन सोशल ग्रुपच्यावतीने सदस्यासह विदयार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करुन प्राचीन वास्तू आणि इतिहास जाणून घेण्यासाठी रविवार रोजी किल्ल्यास भेट दिली. यावेळी विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. युनिटी मल्टिकाँन्स कंपनीने नळदुर्ग किल्ल्यात केलेल्या विकास कामामुळे बदललेल्या किल्ल्याचे रूपडे पाहून सर्वच सदस्य भारावून गेले होते. निसर्गाचा अदभुत नजारा, किल्ल्यातील अफाट परिसर, बदललेले स्वरूप पाहून पावसाळी सहलीत सहकुटुंबसह पावणे दोनशे सदस्यांनी सहभागी होवून आनंद लुटला.
रविवार रोजी सकाळी नऊ वाजता सोलापूरहुन नळदुर्ग किल्ल्यात जैन सोशल ग्रुपचे आगमन झाले. यावेळी युनिटी मल्टिकाँन्सच्या वतीने संचालक भरत जैन व वैशाली जैन यांनी जैन सोशल ग्रूपच्या सर्व सदस्यांचे अभुतपुर्व स्वागत केले. सर्व सदस्यांनी किल्ल्यात पर्यटनाचा आनंद घेतला. यावेळी ऐतिहासिक वास्तू पाणीमहल, बारादरी, उपली बुरुज, दरबार हॉल, हत्तीखाना, हुलमुख दरवाजा, नवबुरुज, मुन्सिफ कोर्ट, नरमादी धबधबा परिसरासह किल्ल्यातील प्राचीन तोफांची पाहणी करुन माहिती जाणुन घेतली. तसेच सर्वच सदस्यांनी बारादरी येथील बोटींगचा आनंद घेतला. त्याचबरोबर किल्ल्यालगत उत्तरेस नव्याने उभारण्यात आलेल्या रिसॉर्टला भेट देवून पाहणी केली. यावेळी सर्वांनी अल्पोहार व भोजनाचाही आस्वाद घेतला.
 याप्रसंगी युनिटी मल्टिकाँन कंपनीचे संचालक भरतकुमार जैन यांच्यासह जैन सोशल ग्रूपचे अध्यक्ष राजेश निमानी, उपाध्यक्ष संजय सेठिया, गौतम छाजेड, अभय गांधी, चेतन सुराणा, जैन सौशल संगिणीचे ग्रुपच्या अध्यक्षा किरण जैन, प्रिती करनावट, सारिका गांधी, इंदिरा वाणीगोत, वैशाली जैन यांच्यासह सुमारे पावणे सदस्यासह विदयार्थीही उपस्थित होते. यावेळी युनिटीचे जुबेर काझी, मुश्ताक जमादार, अमीर फुलारी, जयभीम वाघमारे, यशवंत राठोड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
चौकट : जैन सोशल ग्रुपचे राज्यभरात 60 ग्रुप असून त्याचे 1 लाख 30 हजार सदस्य आहेत. सोलापूर जैन ग्रुपच्यावतीने भावी पिढीस पुर्वजांचा इतिहास व माहिती व्हावी, या हेतुने वर्षभरात प्राचीन व ऐतिहासिक स्थळास भेट देण्यासाठी सहलीचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी विविध शिबिराचेही आयोजन केले जाते. त्याचा नळदुर्ग किल्ल्याच्या सहलीने शुभारंभ करण्यात आल्याचे जैन सोशल ग्रुपचे राज्य व्हाईस चेअरमन उन्मेष करनावट यांनी सांगितले.
फोटो ओळ :- सोलापूर जैन सोशल ग्रुपच्यावतीने नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यात ग्रुपचे अध्यक्ष राजेश निमानी, संजय सेठिया, युनिटीचे संचालक भरत जैन, किरण जैन, प्रिती करनावट यांच्यासह अन्य…

 
Top