पुणे :- परप्रांतातील विदयार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रवेश देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असून जर बाहेरच्या मुलांना प्रवेश देण्याचा प्रयत्न दिल्यास मनसेचे त्यावर बारीक नजर राहील असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
नीटच्या परिक्षेनंतर प्रवेश प्रक्रियेच्या गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या राज ठाकरे यांना सांगितल्या होत्या. त्यासंदर्भात आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेत राज्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे. इतर राज्यांत प्रवेशासाठी नियम आहेत ते आपल्या राज्यातही लागू करण्याची मागणी यावेळी राज ठाकरे यांनी केली.
काल पावासळी अधिवेशनात शिवस्मारकावरुन रणकंदन झाले. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सरकार फक्त राजकारण करत आहे. छत्रपतींच्या स्मारकाला मी विरोध केला होता, कारण महाराजांचे गडकिल्ले यावर खर्च करायला हवा, ती खरी संपत्ती आहे त्याचे संवर्धन करायला हवे. सध्या बुलेट ट्रेनचीही चर्चा सुरु आहे. पण ही ट्रेन मुंबईल महाराष्ट्रापासून तोडण्यासाठीचे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. नोटाबंदी केल्यानंतरही भ्रष्टाचार, काळापैसा उघड होतो आहे. नोटाबंदी केली ती दगडावरच काय असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. देशात फिटनेस चॅलेंज सुरु झाले होते त्यावरुनही त्यांनी जोरदार हल्ला केला. अगोदर देश फिट करा नंतर फिटनेस चॅलेंजचे बघा असा टोला राज ठाकरेंनी लगावला.