उस्मानाबाद :- माजी न्यायमुर्ती बॅ.बी.जी.कोळसे पाटील यांनी धर्मनिरपेक्ष जनता दल पदाधिकारी व कार्यकत्र्यांशी मुंबई येथील पक्ष कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत संवाद साधला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश कार्याध्यक्ष अॅड. रेवण भोसले होते. बॅ.बी.जे. कोळसे-पाटील यांनी यापुढे धर्मनिरपेक्ष जनता दलाबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला.
बॅ. कोळसे-पाटील यांनी न्यायमुर्ती पदाचा राजीनामा देवून माजी पंतप्रधान व्हि.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता दलात प्रवेश केला होता. तसेच त्यांनी जनता दलातून बीड लोकसभेची निवडणुकही लढवली होती. त्यांनंतर त्यांनी अनेक जनहितासाठी सामाजिक आंदोलने केली. तसेच त्यांनी वारकयांना सोबत घेवून डाऊसारखा विषारी प्रकल्प बंद पाडला. आता लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या बरोबर चर्चा करुन बॅ.कोळसे-पाटील यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची माहिती अॅड. भोसले यांनी दिली. राज्यात पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी जनतेचे प्रश्न घेवून राज्यभर जनआंदोलन करण्याचेही या बैठकीत ठरले. यावेळी प्रधान महासचिव प्रतापराव होगाडे, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर , मा.आ. डॉमनिक घोणसालविस,मिलन म्हात्रे, शिवाजीराव परोळेकर, अपर्णा दळवी, सलीम भाटी, युयुत्सु आर्ते, नाथाभाऊ शेवाळे, अॅड. कुलदिपसिंह भोसले, भगवान साळवी आदीसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.