नळदुर्ग : रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अरबी समुद्रात होत असलेल्या शिवस्मारकाबददल भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी अपशब्द बोलून अवमान केल्याप्रकरणी त्यांचा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना नळदुर्ग शाखेच्या वतीने निषेध करण्यात आला. असा प्रकार पुन्हा घडल्यास त्याला उत्तर दिले जाईल, असे नमूद करुन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव मिरकले यांना आज बुधवार रोजी निवेदन देण्यात आले. यावेळी छावा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अमोल मेंडके, शहराध्यक्ष तेजस जाधव, शिवम नागणे, राज मुरमे, दीपक काशीद, गणेश मोरडे, सुरज किल्लेदार, संतोष किल्लेदार रजनीकांत नागणे, राहुल पाटील, बाळू शिंदे, बाळू कोणे, विकास मोरे यांच्यासह अखिल भारतीय छावा संघटनेचे व सकल मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.