नारायण गवळी
तुळजापूर :- येथील माजी नगराध्यक्ष तथा विदयमान नगरसेवक नारायणराजे गवळी यांनी स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज सोमवार दि. 30 जुलै रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अदयाप समजू शकले नाही. या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला असून अनेकांनी या दु:खद घटनेची माहिती फोनद्वारे व सोशल मिडियावरुन इतरांना दिली.
 
Top