नळदुर्ग : सोशल मिडियावरुन कुणाच्याही भावना दुखवणा-या व खोटया अफवा फसरवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये, संशयितना मारहाण न करता सुज्ञ नागरिकांनी त्यांना पोलीसांकडे सोपविण्याचे आवाहन आणदुर ता.तुळजापूर येथे सहायक पोलीस निरिक्षक संजीवन मिरकले यांनी केले आहे.
काही ठिकाणी अफवांमुळे विनाकारण नाहकच लोकाना मारहाण करुन जीवितहानीच्या घटना घडल्याचे सर्वश्रुत आहे . त्याविषयी जनजागृती करण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील आणदुर येथील हुतात्मा स्मारकात बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य हे अनेकांना रोजगार देणारे राज्य आहे.येथे मजूरांचा मोठा तुटवडा आहे. मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. म्हणून देशभरातून विविध राज्यातील मजूर खेडोपाडी येतात.त्यांना बहुतांश मराठी भाषा येत नाही.हे लोक गावात दुकानात खरेदीला येतात बाजारात बाजार किंवा गावात फिरायला जातात .भिक मागायलाही मोठ्या प्रमाणात लोक येतात त्यांची चौकशी करा .तो उडवाउडवीची उत्तरे देत असेल त्याला पकडून ठेवा व तत्काळ पोलीसांना कळवा.त्याला मारहाण वगैरे करु नका,एखाद्याचा नाहक बळी जाण्याची शक्यता असून त्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
सोशल मिडीयाचा वापर समाजहितासाठीव जबाबदारीने करावा,धार्मिक, सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माणिक आलुरे,उपसरपंच आप्पाराव मुळे,माजी पं.स.सभापती बालाजी मोकाशे,विविध संस्थांचे पदाधिकारी,तरुण मंडळाचे कार्यकर्ते , नागरिक उपस्थित होते. शेवटी सर्वाचे आभार पोलीस पाटील जावेद शेख यांनी मानले.