नळदुर्ग : भारतीय स्टेट बँकेच्या नळदुर्ग शाखेत अपुरे कर्मचारी अपु-या सोयीसुविधा अभावी बँकेच्या ग्राहकांना नाहकच मनस्ताप सहन करावा लागत असून तात्काळ याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष घालून विविध समस्या सोडविण्याची मागणी ग्राहकांतुन केली जात आहे.
  नळदुर्ग शहर महामार्गावर वसलेले असून या ठिकाणी ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची सतत गर्दी असते. तर नळदुर्ग मार्गे तीर्थक्षेत्र तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापुर, पंढरपुर, शिर्डी आदी ठिकाणी परप्रांतातुन जाणा-या भाविकांची सतत रिघ लागलेली असते. नळदुर्ग येथे एकमेव भारतीय स्टेट बँकेची शाखा असून .टी.एम सतत चालु आसणे गरजेचे आहे.नळदुर्ग  परिसरातील १८ गावातील नागरिक या बँकेचे खातेदार आहेत. या बँकेत जवळपास ३२ हजारापेक्षा अधिक खातेदार आहेत. मात्र या शाखेत अपुरे कर्मचारी असल्यामुळे आहे त्या कर्मचा-यावर अतिरिक्त कामाचा ताण आहे. त्याचबरोबर जेष्ठ नागरीक, अपंग, निराधार, इतर खातेदार ग्राहकांची बँकेत पैसे काढण्यासाठी भरण्यासाठी दोन दोन तास लाईनमध्ये थांबत असल्याचे चित्र पहावायास मिळत आहे
      सध्या पेरणीचे दिवस असल्याने आर्थिक व्यवहारासाठी पीक कर्ज घेण्यासाठी शेतकरी खातेदार दररोज बँकेत चकरा मारत आहेत. या ठिकाणी वारंवार पासबुक छपाई मशीन बंद पडत असून खातेदारांची संख्या पाहता तात्काळ स्वयंचलित पासबुक छपाई यंत्र बसविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कर्मचा-यांची संख्या वाढवावी, ग्राहकांच्या सोयीसाठी स्वाईप मशीन उपलब्ध करुन बँकेच्या वेळेत कार्यान्वित करावी, गेल्या अनेक वर्षापासून या शाखेत सुरक्षा रक्षकच नाही, त्यामुळे भविष्यात बँकेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी तात्काळ सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी बँकेच्या ग्राहकांतुन केली जात आहे. दरम्यान बँकेचे लेखा परिक्षण कामात बँक व्यवस्थापक व्यस्त आसल्याने त्यांची भेट होवु शकली नाही

नगरसेवक विनायक अंहकारी यानी  बोलताना म्हणाले की,
नळदुर्ग सारख्या २५ हजार  लोकसंख्या असलेल्या शहरात एकच राष्ट्रीयकृत बँक आहे..परिसरातील अनेक गावाशी या बँकेचा संबंध आहे.. परंतू सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे.. बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आसुन अनेक गैरसोयी कायम आहेत. याबाबत आपण बँकेच्या वरिष्ठाकडे वेळोवेळी तक्रार  करुन सुध्दा  कसलीही दखल वरिष्ठ कार्यालयाकडून घेतली जात नाही.

 
Top