उस्मानाबाद : जिल्हयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याची वेतन अधिक्षक ,वेतन पथक उस्मानाबाद यांच्याकडून बंद करण्यात आलेली भविष्य निर्वाह निधीची ( पी. एफ. ) खाती नंदूरबार व अन्य जिल्हयाच्या धर्तीवर पुर्ववत सुरू करण्याची मागणी शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षणाधिकारी उस्मानाबाद यांचेकडे केली होती.सदर मागणीची दखल घेवून अखेर संबधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची
' भविष्य निर्वाह निधीची खाती ' तात्काळ सुरु करण्याबाबतची कार्यवाही शिक्षणाधिकारी
( मा.) यांनी केली आहे.
1 नोव्हें 2005 पुर्वी नियुक्त कर्मचाऱ्याना ' जूनी पेन्शन योजना लागू करण्या संबंधी जिल्हयासह राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यास अनुसरून उच्च न्यायालयानी संबधित कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे अंतरिम आदेश दिले होते. मात्र मा. न्यायालयाच्या निर्णयानुसार याचिका कर्त्या कर्मचाऱ्यांची पी. एफ. खाती सुरु करण्याबाबतची आमलबजावणी उस्मानाबाद जिल्हयात अद्याप झाली नव्हती. तेव्हा उच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधिनस्त राहुन उस्मानाबाद जिल्हयातील वेतन अधिक्षक, वेतन पथक ,उस्मानाबाद यांच्याकडून बंद करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची
' भविष्य निर्वाह निधी ' ( पी. एफ. ) ची खाती पुर्ववत सुरु करण्यासाठी शिक्षणाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे पाठपुरावा करून शिक्षक भारती, उस्मानाबाद यांच्यावतीने मागणी करण्यात आली होती. सदर मागणीचा गांभिर्याने विचार करून औदूंबर उकिरडे शिक्षणाधिकारी ( मा) व वेतन अधिक्षक श्रीमती पाटील यांनी संबधित शिक्षक कर्मचाऱ्यांची " भविष्य निर्वाह निधीची खाती पुर्ववत सुरू करण्याची कार्यवाही केली आहे.या स्वागतार्ह निर्णयाबद्दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे व भालचंद्र साबळे,नानासाहेब बोराडे, एस. चौधरी, एफ. एच. सय्यद, ए. ए.पटेल, एस. ए. लावणे, एस एम. मुल्ला, आदीसह जिल्हयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्यावतीने समाधान व्यक्त केले जात आहे