अहमदनगर : ट्रक व स्कॉर्पिओच्या अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची घटना नगर-सोलापूर मार्गावरील पाटेवाडी शिवारात रविवार दि. 22 जुलै रोजी पहाटे घडली. अपघातातील सर्व मृत हे खरवंडी (ता. नेवासा, जि. नगर) येथील असल्याचे समजते. आषाढी वारीनिमित्त खरवंडी येथील वारकरी पंढरपूरला गेले होते. ते पंढरपूर येथून परत येत असताना नगर-सोलापूर रस्त्यावर कर्जत तालुक्यात त्याच्या स्कॉर्पिओ जीपला ट्रकने धडक दिली. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.