“आगामी तुळजापूर विधानसभेची तयारी सुरू? विदयमान आमदारासह इच्छुकांनी शड्डू ठोकला...” या आमच्या विशेष वृत्तास असंख्य वाचकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देवून प्रतिक्रिया नोंदविल्या. वाचकांच्या या प्रतिक्रियेतून आणखीन इच्छुकांची नावे समोर आली. त्या अनुषंगाने आम्ही आपणासमोर इच्छुकांबददलच इत्यंभुत माहिती सादर करीत आहोत.
![]() |
ॲड. अनिल काळे |
सन 2019 मध्ये होणा-या तुळजापुर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे हे सत्ताधारी भाजपाचे प्रमुख दावेदारापैकी एक असुन ते स्वत: तुळजापुर मतदार संघातीलच रहिवाशी असून मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गेटकेन उमेदवार असल्यामुळे तिस-या क्रमांकावर भाजपाला समाधान मानावे लागले होते. मात्र आता तालुक्यातीलच उच्च विदयाविभुषित इच्छुक उमेदवार असल्यामुळे व सत्तेत असल्याचा काळे यांना फायदा होण्याची शक्यता राजकीय जाणकारातून वर्तविली जात आहे. अनिल काळे हे आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे जवळचे विश्वासू सहकारी आहेत.
केमवाडी ता. तुळजापूर येथील रहिवाशी असणारे ॲड. अनिल काळे हे मागील तीन दशकापासून भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते असून तुळजापूर तालुक्यातील छोटयाशा खेडयातून भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्यापर्यंतची त्यांची झेप वाखणण्याजोगी आहे. जिल्हयातील तुळजापूर विधानसभा मतदार संघ भाजपाकडे खेचण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांना गळ घालून भाजपाच्या पदरात पाडुन घेण्यासाठी काळे यांचे मुख्य योगदान आहे. त्यानुषांगाने आपल्याच तालुक्यातून विधानसभा लढवण्यासाठी ते इच्छुक होते मात्र काही कारणास्तव त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळवू शकली नाही. मात्र त्यांनी आपले काम व पक्षनिष्ठेशी बांधिल राहून आपले कार्य अविरत चालू ठेवले आणि याचे फळ आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या माध्यमातून मिळण्याचा कयास त्यांच्या समर्थकांतून बांधला जात आहे.

कुठल्याही निवडणुकीतील विजयासाठी बुथ निहाय कार्यकर्त्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाची बाब असल्यामुळे तुळजापूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक बुथवर पक्षाचा कार्यकर्ता नेमून विजयाचे गणित बांधण्याचे कार्य अनिल काळे यांच्या नेतृत्वाखाली झाले असल्याचे समजते. उजनीचे पाणी मिळवणे, तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविदयालयाचा प्रश्न सोडवणे, श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना पुर्ववत सुरु करणे, तालुक्यात सौर ऊजेचे प्रकल्प उभे करणे यासाठी पाठपुरावा, आंदोलनाच्या माध्यमातून काळे यांनी प्रयत्न केल्याचे सामान्य भाजपा कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.
ॲड. काळे यांनी भूषविलेली पदे :
* धाराशिव जिल्हा भाजपा सहकारी आघाडीचे 1996 ते 2002 पर्यंत अध्यक्ष
* जिल्हा उपाध्यक्ष्– सन 2000 ते सन 2003 पर्यंत
* जिल्हा सरचिटणीस – सन 2003 ते सन 2006
* जिल्हा उपाध्यक्ष – सन 2006 ते 2010
* भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सन 2014 पासून आजतागायत