काटी :-   तुळजापूर तालुक्यातील काटी  येथे मंगळवार  दि.  31  रोजी  आठवडी बाजारा दिवशी   सकल मराठा समाजाच्या वतीने  पुकारण्यात आलेल्या काटी गाव बंद आंदोलनाला  प्रतिसाद मिळाला. मंगळवार  हा आठवडी बाजाराचा दिवस व या  बाजारासाठी काटीसह दहिवडी, सावरगाव,  वाणेवाडी, खुंटेवाडी, जवळगाव, शेळगाव आदी गावांतील व्यापारी, ग्रामस्थ     आठवडी बाजारासाठी  येत असतात  परंतु मंगळवारी कडकडीत बंद  दिसून  आला. गावातील  सर्व  दुकाने  बंद  ठेवून सर्व  व्यापारांर्‍या या आंदोलनाला पाठिंबा  दर्शविला. 
     
दुपारी  बारा वाजता सकल मराठ्यांच्या वतीने  संदीपान साळुंके,  नागनाथ  रोडे  यांच्या हस्ते मुख्यमंत्र्याना दिलेले निवेदन तलाठी दत्ता कोळी यांना  देण्यात आले. यावेळी सकल मराठा  बांधवानी एक मराठा  लाख मराठा,  जय भवानी जय शिवाजी,  कोण  म्हणतयं देत नाही,  घेतल्या  शिवाय  राहत नाही , अशा गगनभेदी  घोषणा  दिल्या. 
    अनुचित प्रकार  घडू नये यासाठी  तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौरे यांच्या  मार्गदर्शनाखाली  चोख  पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
   या आंदोलनात  संग्राम  हंगरकर, गजानन  देशमुख,  अभिजित  हंगरकर,  शुभम काटे, संदीपान  साळुंके,  नागनाथ  रोडे, दिपक चिवरे, रामेश्वर  लाडुळकर आदीसह सकल मराठा  बांधव  सहभागी झाले होते.

 
Top