नळदुर्ग : भरधाव ट्रक व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होवून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. ही घटना नळदुर्ग-तुळजापूर राज्य मार्गावरील बोरनदवाडी ता. तुळजापूर पाटीजवळ मंगळवार दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
रफीक दस्तगीर शेख (वय 38 वर्षे, रा. गंधोरा, ता. तुळजापूर) असे अपघातात मरण झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. यातील रफीक शेख गंधोरा आपल्या गावातून तुळजापूर कडे दुचाकी क्रं. एम.एच. 14 टीबी 2651 वरुन जात असताना बोरनदवाडी पाटीजवळ तुळजापूर हून नळदुर्ग ला भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रं.जी.जे. 25 यू. 9011 ने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकी चुराडा झाली. तर रफीक ला डोक्यावर गंभीर मार बसल्याने तो ठार झाला. घटनास्थळी गंधोरा गावातील नागरीक व प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती.
नळदुर्ग व तुळजापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचा-यानी भेट दिली. घटनास्थळी रफीक चे आई-वडील आक्रोश करीत होते. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.