तुळजापूर :- तालुक्यातील माळुंब्रा-गोंधळवाडी-पिंपळा खु. पिंपळा बु.-देवकुरळी-धोत्री-खडकी ते जिल्हा सरहद्द व सिंदफळ-रायखेल-धनेगाव-कुंभारी-कोरेवाडी ते देवकुरळी या रस्ता कामाचे भुमीपूजन माजी कॅबिनेट मंत्री तथा विदयमान आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते बुधवार दि. 1 ऑगस्ट रोजी कुंभारी येथे सकाळी साडे नऊ वाजता तर पिंपळा खु. येथे अकरा वाजता होणार आहे. सदरील दोन्ही रस्ता कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 19.85 कोटी निधी मंजूर झाला असून त्यातून 35.250 कि.मी. चा रस्ता होणार आहे.
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा-गोंधळवाडी-पिंपळा खु. पिंपळा बु.-देवकुरळी-धोत्री-खडकी ते जिल्हा सरहद्द हा 17.750 कि.मी. रस्ता असून त्यापैकी 17.495 कि.मी. चे मजबुतीकरण व डांबरीकरण असून 255 मिटरचे काँक्रीटीकरण प्रस्तावित आहे. या कामसाठी 1025.56 लाख एवढया रक्कमेची प्रशासकीय मान्यता असून तांत्रिक मान्यता 903.48 लाख एवढी आहे. तसेच निविदेची 660.66 लाख एवढी रक्कम असून यात 36 पुलांसह नालींचा समावेश आहे.
त्याचबरोबर सिंदफळ-रायखेल-धनेगाव-कुंभारी-कोरेवाडी ते देवकुरळी हा 17.500 कि.मी. चा रस्ता असून यामध्ये 16.963 कि.मी. चे मजबुतीकरण व डांबरीकरण व 597 मिटरचे काँक्रीटीकरण होणार आहे. तसेच या मार्गावर लहान मोठे असे 24 पुलांचा समावेश आहे. सदरील कामासाठी 959.25 लाख एवढया रक्कमेची प्रशासकीय मान्यता असून तांत्रिक मान्यता 845.55 लाख एवढी आहे. तसेच निविदेची 623.41 लाख एवढी रक्कम असून या कामाची मुदत एक वर्षाची आहे.
आमदार मधुकरराव चव्हाण यांनी वरील दोन्ही रस्त्याबाबत आग्रही मागणी करुन दोन्ही रस्ते मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले होते.