सोलापूर :- एकोणीस वर्ष वयोगटाखालील बालक्रिकेटपट्टूची लंडन येथे होणा-या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी सोलापूर मधुन जाणा-या सायंक भरत जैन याने मुंबई येथे भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली असता सायंक याचे कौतुक करुन त्यास बेस्ट ऑफ लक देवून क्रिकेट स्पर्धेच्या तेंडुलकरानी शुभेच्छा दिल्या.
दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी मधुन सोलापुर येथील सायंक भरत जैन (वय 13) याची एकोणीस वर्ष वयोगटाखालील लंडन येथे होणा-या क्रिकेट सामन्यासाठी यापुर्वीच निवड झाली असुन हा क्रिकेट सामना अठरा दिवस चालणार असून दि. 5 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत या कालावधीत होत आहे. या क्रिकेट स्पर्धेसाठी सायंक हा दि. 3 ऑगस्ट रोजी सोलापूर येथून लंडनला रवाना होणार आहे. सायंक जैन हा सोलापूर येथील लिटल फ्लावर शाळेचा विद्यार्थी असून यावर्षी तो आठवी इयत्तेत शिकत आहे.
नुकतेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची मुंबई येथे युनिटी मल्टिकॉन्सचे संचालक भरत जैन यांनी त्यांचे सुपूत्र सायंकसह पत्नी वैशाली, मुलगी ध्रुवी आदींनी भेट घेतली असता सायंक यास क्रिकेट सामन्यात खेळण्याविषयी बहुमोल मार्गदर्शन करुन तेंडुलकर यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणीला यावेळी उजाळा दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी सायंकची निवड झाल्याबद्दल सोलापूर येथील लिटल फ्लावर शाळा, जॅमसीव्ही क्रिकेट ॲकडमी, पुण्याच्या बदेक स्पोर्टसच्यावतीने आणि युनिटीचे मुख्य संचालक कफील मौलवी, जयधवल करकमकर, अनिल पाटील, माजी रणजी पट्टू अनिल सामराणी आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.