नागपूर -: राज्यातील आमदारांना दिलेल्या जाणा-या प्रवास भत्यात वाढ करुन आता प्रति किलोमीटर 20 रुपये करण्यात आले आहे. नागपुर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सदरील सुधारणा विधयेक एकमताने मंजुर करण्यात आले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात होणारी वाढ, जनतेच्या कामासाठी, अधिवेशन, बैठकांसाठी फिरावे लागते म्हणून आमदारांच्या प्रवास भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली असल्याचे गिरीष बापट यांनी सांगितले.
महाराष्ट्रात 2016 मध्ये पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात एका विधेयकाद्वारे आमदारांचे व माजी आमदारांचे वेतन, भत्ते तसेच निवृत्तिवेतन एकमताने वाढविण्यात आले होते.
महाराष्ट्रातील आमदारांचा पगार किती?
महागाई भत्ता 91,120 रुपये
दूरध्वनी खर्च 80, 00 रुपये
संगणक चालकाचा पगार 10, 000 रुपये
टपालासाठी 10, 000 रुपये
मूळ पगार 67, 000 रुपये