उस्मानाबाद : तालुक्यातील सारोळा (बु़) येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने शुक्रवार दि़. २० जुलै रोजी सकाळी ९ वा़ ११ हजार वृक्ष वितरण व लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे़ यावेळी पीकविमा भरणा केंद्राचा शुभारंभ व शेतकरी मेळावाही घेण्यात येणार आहे़
        कार्यक्रमात जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते वृक्ष वितरण व लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे़ जिल्हा परिषद व शारदा विद्यानिकेतन हायस्कूलच्या प्रांगणात वृक्षरोपण करण्यात येणार आहे़ यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे, विभागीय वन अधीक्षक राजेश्वर सातेलीकर, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक 'पुण्य नगरी' चे वृत्त संपादक धनंजय रणदिवे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश देवगिरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ शेतकऱ्यांची पीकविमा भरताना गैरसोय होऊ नये, यासाठी गावातच पीकविमा भरणा केंद्र सुरू करण्यात येत आहे़ याचा शुभारंभ आज मान्यवरांच्या हस्ते होणार आहे़ तर शेतकरी मेळाव्यात जिल्हाधिकारी श्रीग़मे, कृषी अधीक्षक श्री़ घाटगे व वन अधीक्षक श्री़सातेलीकर यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे़ या सोहळ्यास शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सारोळा ग्रामपंचायतचे सरपंच प्रशांत रणदिवे, उपसरपंच भाग्यश्री देवगिरे व ग्रापं सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे़...

 
Top