लातूर : उदया रविवार दि. 29 जुलै रोजी लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लातूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील बैठक बार्शी रोड पीव्हीआर थिएटरच्या पाठीमागे असलेल्या राहीचंद्र मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता होणार आहे. या बैठकीस राज्यातील विविध जिल्ह्यातील समन्वयक व मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्यभर सुरू असलेले आंदोलन, मराठा आरक्षण, शैक्षणिक सवलती, मराठा मुलांचे वस्तीगृहाबद्दल सरकारने घेतलेली भूमिका तसेच अन्य मागण्यांबाबत या बैठकीत सविस्तर विचारमंधन होणार आहे. आंदोलनाची पुढील दिशाही ठरविण्यात येणार आहे. बैठकीनंतर समन्वयक पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची माहिती मराठा क्रांती लातूरच्या वतीने देण्यात आली आहे.