तुळजापूर :-  तालुक्यातील तामलवाडी येथे  गुरुवार  दि.  26 जुलै रोजी तामलवाडीसह परीसरातील तमाम सकल मराठा समाजाच्या वतीने सकल मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे, मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करणार्‍या मराठा बांधवावरील गुन्हे माघारी घेण्यात घ्यावेत यासाठी राष्ट्रीय  महामार्ग  क्रमांक  52 तामलवाडी येथील  उड्डाण  पुलावर दोन्ही  बाजूंनी  रास्ता रोको  आंदोलन करण्यात आले. सुमारे दिडतास  चाललेल्या  या आंदोलनामुळे वाहनांच्या  लांबचलांब रांगा लागल्या होत्या.  त्यामुळे  सोलापूर व तुळजापूर,  उस्मानाबादला जाणारे  प्रवासी वाहतूक  खोळंबल्यामुळे ताठकळले होते. प्रारंभी  येथील  शिवरत्न  नगरमध्ये जिल्हा परिषद सदस्या सौ.  सुषमा  लोंढे,  नागेश  राऊत, तमेज पटेल, रामा मस्के, राहुल  वाघमारे  यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  करण्यात आले.  त्यानंतर प्रमुख  मार्गावरून जयभवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा,   कोण म्हणतय देत नाही  घेतल्याशिवाय राहत नाही अशा गगनभेदी घोषणाबाजी करीत  गावातील  प्रमुख  मार्गावरून  रॅली  काढून उड्डाण पूलावर तासभर  ठिय्या आंदोलन  करुन शांततेत  वहातूक रोखून धरली होती. या आंदोलनास पाठिंबा  देण्यासाठी बहुजन  समाज  तसेच  तामलवाडीसह परिसरातील सुरतगाव, वडगाव,  सावरगाव,  काटी, पिंपळा(बु.) पिंपळा ( खु.), धोत्री, देवकुरुळी, पांगरदरवाडी, माळुंब्रा, जळकोटवाडी,  सांगवी, खडकी, उळे, हगलूर  आदी गावातील बहुजन  समाज  बांधवासह    सकल मराठा बांधव मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले होते. सध्या महाराष्ट्रभर आरक्षणासाठी  पेटलेला  वणवा लक्षात घेऊन व आंदोलक मोठ्या संख्येने  आंदोलनात  उतरल्याने यावेळी  कोणताही  अनुचित प्रकार  घडू  म्हणुन अतिरिक्त  राज्य पोलीस  दलाच्या तुकडीसह तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि चौरे यांनी चोख  पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी अॅड. गजानन  चौगुले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड.  धिरज पाटील, राष्ट्रवादी युवक  तालुका  अध्यक्ष आनंद  कंदले,  अण्णासाहेब गुंड आदींनी आपल्या  भाषणात  न्याय  हक्काचे  मराठा  आरक्षण मिळायलाच पाहिजे यासाठी भाजप सरकारवर सडकून टिका करीत मराठा आरक्षण,  व आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे  मागे घेण्यात  यावेत यासाठी सकल मराठा  समाजाच्या  वतीने  तहसीलदार  दिनेश  झांपले,  उपविभागीय  पोलीस अधिकारी संदीप घुगे, सपोनि चौरे यांना  निवेदन देण्यात आले. 
          यावेळी  अॅड.गजानन  चौगुले, माजी  जिल्हा परिषद अध्यक्ष  धिरज पाटील, माजी  जि.प. सदस्य  संतोष  बोबडे, जि.प. सदस्या सौ. सुषमा  लोंढे, राजकुमार  पाटील, सरपंच  ज्ञानेश्वर  माळी, उपसरपंच  दत्तात्रय वडणे, राष्ट्रवादी  युवक तालुका अध्यक्ष  आनंद  कंदले,  पांगरधरवाडीचे सरपंच विजय निंबाळकर, चनबसवनप्पा मसुते, बालाजी डोंगरे,  शंकर चोरगडे, पत्रकार  अविनाश  गायकवाड, सर्जेराव  गायकवाड, सचिन  शिंदे, जगन्नाथ  गवळी, सुधीर  पाटील,   मुकुंद  गायकवाड, शिवाजी  पाटील,  अप्पराजे भोसले, कृष्णा  घोटकर,  प्रभाकर  गायकवाड, नानासाहेब पाटील, बलभीम  गायकवाड,  मल्लीकार्जुन मसुते, भास्कर  पवार, शिवदास पाटील, निरंजन  करंडे    आदीसह तामलवाडी व परिसरातील बहुजन समाज  तसेच  सकल मराठा  बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
 
Top