![]() |
दत्तात्रय धुम्मा |
नळदुर्ग :- शहरातील अक्कलकोट रोड लगत असलेल्या मुळे नगर येथे राहणा-या दत्तात्रय बाबूराव धुम्मा या युवकाचे शुक्रवार दि. 20 जुलै रोजी सकाळी दिर्घआजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, बहीण असा परिवार आहे. धुम्मा यांनी उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँक नळदुर्ग शाखेत काही काळ काम केले आहे. रोकड्या हणूमान तरुण मंडळ, जयहिंद तरुण मंडळ व्यासनगर यासह मित्रपरिवाराने भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली. अंत्यविधी आज दुपारी 2 वाजता होणार आहे.