उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहरातील महिला रूग्णालयाच्या 200 खाटांच्या प्रस्तावावर आरोग्य संचालनालयाकडून कार्यवाही सुरू असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी लेखी उत्तरात दिली आहे. नियम 93 अन्वये सूचना उपस्थित करून आ. सतीश चव्हाण यांनी उस्मानाबाद शहरातील महिला रूग्णालयात खाटांची अपुरी असलेली सं‘या, औषधांचा असलेला तुटवडा, अपुरी कर्मचारी सं‘या, 200 खाटांच्या प्रस्तावावर शासनस्तरावर संथ गतीने सुरू असलेली कार्यवाही, यामुळे महिलांची होत असलेली गैरसोईचा मुद्दा आज (दि.20) सभागृहात उपस्थित केला होता.
उस्मानाबाद शहरात 2014 मध्ये महिला रूग्णालय सुरू करण्यात आले असून शहरासह परिसरातील 22 प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार या रूग्णालयावर असणे, महिला रूग्णालयाची उभारणी झाल्यावर परिसरातील महिला रूग्णांची सोय होण्याची अपेक्षा होती परंतु महिला रूग्णांची सातत्याने हेळसांड सुरूच असणे, दररोज रूग्णालयात 200 ते 250 रूग्ण येतात मात्र याठिकाणी फक्त 60 खाटाच उपलब्ध असणे, 60 खाटांच्या तुलनेमध्ये कर्मचारी सं‘या कमी असून अपुर्या कर्मचार्यांवरच व्यवस्थापन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. बर्याच वेळेस रूग्णालयात खाट रिकामी नसल्यास रूग्णांना खाजगी रूग्णालयाकडे जावे लागते परिणामी रूग्णांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. रूग्णालयात खाट, गाद्या व इतर साहित्यही व्यवस्थित नाही. तसेच औषधांचाही तुटवडा असणे असे प्रश्न उपस्थित करून सदर रूग्णालय 200 खाटांचे करावे व त्यासाठी आवश्यक असणारी कर्मचारी वर्गास मान्यता मिळावी अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सदरील सूचनेव्दारे केली होती.
आ. सतीश चव्हाण यांच्या प्रश्नाला आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी लेखी उत्तर दिले असून त्यात उस्मानाबाद येथील महिला रूग्णालयात वर्ग 1 ते 4 ची 71 पदे मंजूर असून 50 पदे भरलेली आहेत. रूग्णांची सं‘या जास्त असली तरी त्यांची अडचण होऊ नये याची दक्षता घेण्यात येते. सदर रूग्णालय 200 खाटांचे श्रेणीवर्धीत करण्याच्या प्रस्तावाची आरोग्य संचालनालयाकडे कार्यवाही सुरू असल्याचे म्हटले आहे.