लोहारा (इकबाल मुल्ला) :-
सह्याद्री फाउंडेशन्स व चाईल्ड-लाईन उस्मानाबाद यांच्यावतीने दि.3 ऑगस्ट रोजी उस्मानाबाद तालुक्यातील राजुरी येथील जि.प.प्रशालेत 1098 या टोल फ्री नंबरची जनजाग्रुती व ग्रामपंचायत मधील स्वच्छता कर्मचारी यांना मोफत मास्क वाटपाचा कार्यक्रम व या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्ती प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी प्रमुख म्हणुन सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दापके — देशमुख दिग्गज,जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे,सरपंच सौ.लताबाई देडे,पं.स.सदस्य कुसुमताई इंगळे,
मुख्याध्यापक दराडे,अदि उपस्थित होते.
यावेळी सह्याद्री फाउंडेशन्स संस्थापक-अध्यक्ष डाँ.दापके-देशमुख दिग्गज यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन करताना चाईल्ड-लाईन या संस्थेचा उपयोग अनाथ,बेवारस व निराधार मुलांसाठी आपण सर्वांनी मिळून करावा,असे आवाहन केले.
तसेच यावेळी उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी मास्क चा उपयोग करावा व आरोग्याची काळजी घ्यावी,तसेच सह्याद्री चे कौतुक करताना *धनंजय रणदिवे मित्र मंडळ* ही संस्था तुमच्या सोबत असेल अशी ग्वाही यावेळी दिली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सह्याद्रीचे कार्यकारी संचालक गजानन पाटील यांनी केले.तर आभार डोके सर यांनी मानले.
या कार्यक्रमास महीला बचत गटाच्या अध्यक्षा बबीता कोळी,सुरज पडवळ, पत्रकार सय्यद शाहरुख,सय्यद आसीफ,बालाजी घोडके,दादा कोर्के,बी.एम.शिरसट, व्ही.डी.पाटील,एस.एस.इसाके,जे.एन.पाटील, एस.डी.सुरवसे,बनकर,यांच्यासह शिक्षक,ग्रामस्थ, महीला,संस्थेचे पदाधिकारी,व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.