तुळजापूर :- तुळजापूर तालुका क्रीडाअधिकारी कार्यलय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 14 व 17 वर्ष वयोगटातील बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. प्रारंभी स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा मार्गदर्शक एम जी पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी संस्थापक डॉ जितेंद्र कानडे होते तर यावेळी पं.स.सदस्या वैशाली मुळे, सरपंच सरिता मोकाशे,जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे सदस्य अशोक बनकर, माजी क्रिडा मार्गदर्शक विष्णू दळवी, अलका बिराजदार, बसवेश्वर निसरगुंडे,अनिल घुगे यांची उपस्थिती होती.
यावेळी सैनिकी स्कूल तुळजापूर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय 14 वर्षे व 17 वर्ष बॅडमिंटन स्पर्धेत विजयी ठरलेल्या व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या श्री श्री गुरुकुलच्या मुलींच्या संघाचा प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बुद्धीबळ स्पर्धेसाठी तुळजापूर तालुक्यातील 23 शाळेतील 145 विध्यार्थी व 24 मुलींनी सहभाग नोंदविला. यामध्ये 14 व 17 वर्ष वयोगटात एकलव्य आश्रम शाळा यमगरवाडी, श्री श्री गुरुकुल अणदूर,सैनिक स्कूल तुळजापूर, धरित्री विद्यालय नळदुर्ग,जि प शाळा गंजेवडी ,सरस्वती विद्यालय तामलवाडी, तुळजामाता इंग्लिश स्कूल तुळजापूर या शाळेतील विध्याथ्यांची निवड जिल्हा स्पर्धेसाठी झाली आहे.
यावेळी पंच म्हणून अनिल घुगे, विष्णू दळवी, अशोक बनकर, राजेश जगताप, अनिल धोत्रे, राजेश बिलकले व रामेश्वर सावंत यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दादाराव घोडके, मार्तंड मोकाशे, लक्ष्मण नरे, सुरेश गायकवाड, दशरथ शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख रामेश्वर सावंत, सूत्रसंचालन प्रियांका जाधव यांनी तर आभार संतोष मोकाशे यांनी मानले.