"श्रावण मासी हर्ष मनासी
हिरवळ दाटे चोहिकडे"
बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची कविता आठवते.
श्रावण महिना म्हणजे आनंदाची पर्वणी. निसर्ग हिरवाईने, पानाफुलांनी सजलेली, पावसाच्या सरीने न्हाऊन गेलेली धरती माता, पाखराचे मंजूळ स्वरांनी मन आनंदून जाते. श्रावण महिन्याच्या स्वागतास जणू काय निसर्ग सज्ज झालेला आहे. आजूबाजूचा निसर्ग पाहून आपले मन आनंदून जाते. त्यात हिंदू धर्मातील सण, उत्सव, देवदर्शन ह्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ह्या महिन्यातील पौर्णिमा श्रवण नक्षत्रात येते म्हणून श्रावण असे नाव पडले आहे. ह्या महिन्याला सर्व व्रताचा राजा असे म्हणतात. ह्या महिन्यात प्रत्येक दिनाला एका देवाची पूजाअर्चा केली जाते.
श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना श्रावण मानतात. या महिन्याला भगवान शिवशंकराचा महिना असेही म्हणतात. ह्या महिन्यात शिवशंकराच्या उपासनेला विशेष महत्व प्राप्त आहे. सोमवार शिवशंकर, मंगळवारी नववधू मंगळागौर साजरी करतात. बुधवारी बुधाचे पूजन व बृहस्पती पूजन तसेच शुकवारी ज्योती ची पूजा, अपत्यांना औक्षण करणे, शनिवारी हनुमान ब्रम्हचारी पूजन, रविवारी आदित्य पूजन करण्यात येते. प्रत्येक वारांचे वेगळे वैशिष्टये घेऊन येणारा श्रावण मनामध्ये वेगळा आनंद वेगळे चैतन्य घेऊन येतो.
सर्वप्रथम श्रावण शुध्द पंचमीला नागपंचमी साजरी करतात तसेच शुध्द सप्तमीला कल्फी जयंती व श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा तसेच रक्षाबंधन हे भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण साजरा केला जातो. तसेच ह्या दिवशी नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. कोळी बांधव समुद्राची पूजा करुन समुद्राला नारळ अर्पण करतात. त्याचबरोबर श्रावण अष्टमीला गोकूळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव घराघरात, मंदिरात मोठ्या आनंदात उत्साहात गोकळाष्टमी साजरी केली जाते. आठ दिवसांचा सप्ताह केला जातो भजन, किर्तन श्री कृष्णस्तृती, श्रीकृष्णलीला वाचन केले जाते. नववीला गोपाळकाल्याचा मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. गोविंदाकडून दहीहंडी फोडली जाते.
या महिन्याचा शेवटचा सण म्हणजे पिठोरी अमावस्या. हा सण स्त्रीया सौभाग्यासाठी व संतान प्राप्तीसाठी व्रत करतात. तसेच श्रावण महिन्यात दानाला विशेष महत्व आहे. व्रत वैकल्ये वैकल्याचा अर्थ विकलता म्हणजे बारी होणे, स्वार्थ आणि परमार्थ साधणारे व्रत आहे. उपासना, सण, उत्सव साजरे करण्याचा मोठा उद्देश ऋतू प्रमाणे त्या त्या महिन्यातील विशेष महत्व पुढच्या पिढी पर्यत पोहचवणं असा श्रावणमास मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करतात.
माझ्याकडून श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
येता श्रावणमास होतो आनंद हर्ष
निसर्ग शिकवी उल्हास हर्ष
मनामनातून मरगळ काढू हर्ष आनंदाने राहू
आपली भारतीय संस्कृती जतन करू
- कविता रमेशराव पुदाले