लोहारा (इकबाल मुल्ला) :-
वाशी (जि. उस्मानाबाद) येथे भाजप जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाची तालुकास्तरीय बैठक दि.11 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. या बैठकीत शिवसेना सर्कल प्रमुखासह अनेकजनांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे,भाजप जिल्हा सरचिटणीस सतीश देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष सचिन (नाना) इंगोले,भाजप तालुका सरचिटणीस भागवत (नाना )कवङे,भाजप शहराध्यक्ष बबन (बाबा) कवङे, भाजप महिला तालुकाध्यक्ष ञिशाला देशमुख, विस्तारक पांङुरंग, आण्णा पवार, आदीजण उपस्थित होते.
या बैठकीत शिवसेना सर्कल प्रमुख ङोंगरेवाङी अजित नवनाथ कुरूंद,बालाजी सगरे,पाराचे दत्ताञय माळी,यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी व भाजप कार्यकारणी सदस्य नितीन काळे यांच्या हस्ते सत्कार करुन भाजप पक्षात प्रवेश देण्यात आला.या बैठकीत शिवशक्ती सहकारी साखर कारखाना निवङणुकी बद्दल चर्चा करण्यात आली. हि निवडणुक पुर्णतहा ताकतीने लढवु असे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगीतले.
यावेळी प्रदिपसिंह ठाकुर, बाळासाहेब पाटील,महादेव लोकरे, सुंदर उघङे, शिवाजी माने,लक्ष्मण आटुळे,राजगुरू कुकङे, राजु कवङे,बापुराव उंदरे,दादा तळेकर,संजय शिंदे, डॉ. अनंता कुलकर्णी यांच्यासह सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुख व सर्व जि.प.गट,पं.स. गणातील व वाशी शहरातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.