तुळजापूर :- दिल्ली येथिल जंतर मंतर मैदानावर काही समाजकंटक एकत्र येऊन भारताचे पवित्र गृंथ संविधान जाळणाऱ्या व आंबेडकर मुर्दाबाद घोषणा देणाऱ्यावर कडक शासन करण्यात यावे यामागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)च्या वतीने तुळजापूर पोलिस स्टेशनचे निरिक्षक राजेंद्र बोकडे यांना निषेधाचे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला .
सविस्तर वृत्त असे कि, भारतीय राज्यघटणेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरणात संविधान प्रत फाडणा-यांचे कृत्यकरणा-यांवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर रिपाईचे जिल्हासरचिटणीस तानाजी कदम,मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष आनंद पांडागळे,विधान सभाध्यक्ष प्रकाश कदम,तुळजापूर शहराध्यक्ष अरूण कदम,आप्पा कदम,विशाल मस्के,काळूंके,अशोक कांबळे,दाजी माने,रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे तालुकाध्यक्ष शुभम कदम,बापू सोनवणे,महादेव सोनवणे युवराज साबळे,आदिंसह कार्यकर्ते पदाधिका-यांच्या स्वाक्ष-या आहेत.
नळदुर्ग येथेही रिपाइंच्यावतीने कारवाई करण्याची मागणी
नळदुर्ग :- जंतरमंतर (दिल्ली) येथे संविधानाची प्रत जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नळदुर्ग पोलिसांना निवेदनातून करण्यात आली. निवेदनावर एस. के. गायकवाड, अरुण लोखंडे, मारुती बनसोडे, भैरवनाथ कानडे, बाबा बनसोडे यांच्यासह आदींच्या सह्या आहेत. पोलिस उपनिरीक्षक डी. डी. राडकर यांनी निवेदन देण्यात आले.