नळदुर्ग (प्रतिनिधी) :- अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या पंचशील तत्त्वाचे काटेकोरपणे पालन केल्यास जागतिक पातळीवर कोठेही हिंसाचार व महिलावर अत्याचार होणार नाहीत, जो बुद्ध स्वीकारेल तो शुद्ध होऊन समाधानाने जीवन जगेल तेव्हा प्रत्येकाने पंचशीलाचे काटेकोरपणे पालन करावे, असे प्रतिपादन प्राध्यापक विवेकानंद वाहूळे यांनी दहिटणा तालुका तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
बुद्ध विहार समन्वय समिती उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या वतीने वर्षावास निमित्ताने आयोजित धम्म जागृती अभियाना अंतर्गत दहिटणा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते आर एस गायकवाड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भिमशाहिर नागनाथ दुपारगुडे संगीत शिक्षक दशरथ शिंदे पत्रकार दयानंद काळुंके आदी उपस्थित होते. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक रीत्या बुद्ध वंदना घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुद्धविहार समन्वय समितीचे जिल्हा समन्वयक मारुती बनसोडे यांनी केले. तर सूत्रसंचालन रिपाईचे जिल्हा प्रमुख सल्लागार एस के गायकवाड यांनी केले. यावेळी दत्ता बागडे, अर्चना बागडे, सागर सुरवसे, सचिन कांबळे, राम कांबळे, सिद्राम वाघमारे, संतराम वाघमारे, अजय गायकवाड, अनुराज गायकवाड, युवराज गायकवाड, साळुबाई वाघमारे, सीमा गायकवाड, सपना सुरवसे, अश्विनी कांबळे, आम्रपाली कांबळे, कमलाकर बनसोडे, साखराबाई कांबळे सह महिला ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते