लोहारा (इकबाल मुल्ला) :-
आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त लोहारा हायस्कुल शाळेत दि.11 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षा घेण्यात आली. या स्पर्धा परिक्षेस उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धा परिक्षेत हायस्कुल लोहारा,भानुदासराव चव्हाण महाविद्यालय लोहारा येथील 435 विद्यार्थांनी सहभाग नोंदविला.

यावेळी सर्वप्रथम साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन उस्मानाबाद फकीरा दल प्रदेश प्रमुख सतिश कसबे व लोहारा हायस्कुलचे मुख्याध्यापक एस.एन.पांचाळ यांच्या हस्ते करुन स्पर्धा परिक्षेस सुरुवात करण्यात आली.
यावेळी आरोग्य व स्वच्छता सभापती नगरपरिषद  देवानंद येडके(उस्मानाबाद),युवक कार्यकर्ते अमोल पेठे(उस्मानाबाद)डी.एम पोतदार,बाळासाहेब लांडगे, विठ्ठल वचने पाटील,व्ही.एस.नागणे,बी.एस.पाटील, सदाशिव बचाटे,होळकुंदे सर,शिदोरे,पत्रकार महेबुब फकिर,शेषेराव घोडके,प्रा.राजपाल वाघमारे,प्रा यशवंत चंदनशिवे,प्रा.किर्तने,प्रा.पात्रे,वसंत दादा  पाटील हायस्कुल  संलग्न   नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ विद्यालय प्रा.सचिन शिंदे व लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते दिपक प्रकाश रोडगे,लक्ष्मण कुंडलिक सगट,अभिजित सगट,आक्षय सगट,शाम रोडगे, बालाजी कसबे,लखन सुरवसे,सुरज कांबळे,स्वप्निल थोरात,रोहित थोरात,बाबाजी थोरात,यांच्यासह शिक्षक,विद्यार्थी,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top